अविनाश क्षेत्र पंढरी
406.
अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वर्ता नये मना ॥१॥
सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथे उभा पाहे पांडुरंग ॥२॥
आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाही पै तत्त्वतं यया तीर्थो ॥३॥
करावे ते स्नान पुंडलीक वंदन । देखावें चरण विठोबाचे ॥४॥
जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनी कवण तीर्थीं ॥५॥
