वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

सहस्रदळ ब्रह्मरंध्र

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075157 · अभंग क्र. ४१३

413.
सहस्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्री देखे ।
देखणा पारुखे ते ठायी बा ॥१॥
नादी नाद भेद भेदुनी अभेद ।
पश्चिम मार्गी आनंद देखूनी राहे ॥२॥
मन पवन निगम आगम सुरेख ।
आधार सहस्रदळ देख देही नयनी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे डोळा हा प्रणव ।
निवृत्तीने अनुभव मज दिधला ॥४॥

अर्थ :
योगी पुरुषाने सहस्रदळ कमळातील ब्रह्मरध्रातंर्गत नीळी ज्योती पाहिली की त्याचा पाहिलेपणा निघुन जातो. नादाच्या ठिकाणी असणारा नादधर्म जगात द्वैत भासत असणारा भेद, अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानाने नाहीसा करुन तो दैवीसंपत्तीरुप पश्चिम मागनि मन प्राण वेद, शास्त्र अशा तऱ्हेचे भासणारे निरनिराळे पदार्थ या सहस्र दळातील ज्योतीच्या ज्ञानाने ब्रह्मरुप आहेत असे प्रतीतिला येईल. योगाभ्यासातील प्रणवरुप ध्यानाच्या डोळ्यांनी निवृत्तीनाथांच्या कृपेने मला आत्मसुखाचा अनुभव करून दिला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग