आरती ज्ञानराजा । महा
407.
आरती ज्ञानराजा । महा कैवल्य तेजा ।
सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥१॥
आरती ज्ञानराजा ॥धृ॥
लोपले ज्ञान जगी । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नांव ठेविले ज्ञानी ॥२॥
प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रम्हाचि केले ।
रामा जनार्दनी । पायी टकचि ठेले ॥३॥
