वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

सगुण देह बापा निर्गु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075080 · अभंग क्र. ४१४

414.
सगुण देह बापा निर्गुण माझे शीर ।
हा तो भेदाकार कैशापरी ॥१॥
दैवी असुरी पूर्व पश्चिम मार्ग की रे ।
शून्यांतील सारे चराचर हे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा ।
नयनी अर्धमात्रा सर्व जन ॥३॥

अर्थ :
जसे एका देहाच्या ठिकाणी धड व शीर असे दोन भाग असतात. त्याप्रमाणे आत्म्याचे सगुणरुप हा देह व निर्गुणरुप शीर आहे. तसे पाहिले तर दोन्ही एकच आहेत. दैवी संपत्ती किंवा आसुरी संपत्तीचे पुरुष हे दोन्ही माया कार्यच आहेत. हे गुरुपुत्रा सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये अर्धमात्रारुप एक ब्रह्मच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग