वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 2. वारकरी संतांच्या आरत्या

संत नामदेव महाराज आर

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073054 · अभंग क्र. ४१३

413.
संत नामदेव महाराज आरती

जन्मता पांडुरंगे । जिव्हेवरी लिहिले ।
शतकोटी अभंग । प्रमाण कवित्व रचिले ॥१॥
जय जयाजी भक्तराया । जिवलग नामया ।
आरती ओवाळिता । चित्त पालटे काया ॥धृ.॥
घ्यावया भक्तिसुख । पांडुरंगे अवतार ।
धरुनिया तीर्थमिषे । केला जगाचा उद्धार ॥ जय.॥२॥
प्रत्यक्ष प्रचीती हे । वाळवंट परिस केला ।
हारपली विषमता । द्दैतबुद्धी निरसली ॥ जय.॥३॥
समाधि माहाद्वारी । श्रीविठ्ठलचरणी ।
आरती ओवाळितो । परिसा कर जोडू ॥ जय जयाजी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग