संत गजानन महाराज आरत
411.
संत गजानन महाराज आरती १
जय जय सत् चित् स्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवरी जडमूढ ताराया ॥धृ॥
निर्गुण ब्रम्ह सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।
ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी ।
लीलामात्रे धरिले मानव देहासी ॥१॥
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा ।
करूनी "गणि गण गणात बोते" या भजना ।
धाता हरिहर गुरूवर तूचि सुखसदना ।
जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना ॥२॥
लीला अनंत केल्या बंकट सदनास ।
पेटविले त्या अग्नीवांचूनि चिलमेस ।
क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रम्हगिरीच्या गर्वाचा नाश ॥३॥
व्याधि वारुन केले कैका संपन्न ।
करविले भक्तांलागी विठ्ठल-दर्शन ।
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन ॥४॥
