वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

आकाश हे असे माझे शिर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075087 · अभंग क्र. ४०८

408.
आकाश हे असे माझे शिर बापा ।
कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती ॥१॥
आधारापासूनी सहस्रदळावरी ।
निःशब्द निरंतरी नारी एक ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथे ।
तोचि जीवन्मुक्त संत योगी ॥३॥

अर्थ :
ज्या योग्याला असे वाटते की आकाश हे माझे मस्तक आहे. दिशा माझे कान आहे. त्या दिशारुप आकाशांत ज्ञानाचा आवाज उठतो. आधार चक्रापासून सहस्रदळापर्यंत अशी एक कुंडलिनी नाडी आहे. असा ज्याला अनुभव आहे. तोच जीवन्मक्त, संत योगी आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग