वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

उदंड ऐकिला उदंड गाइल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076037 · अभंग क्र. ४११

411.
उदंड ऐकिला उदंड गाइला ।
उदंड देखिला क्षेत्रमहिमा ॥१॥
पंढरीसारिखे नाही क्षेत्र कोठे ।
जरी ते वैकुंठ दाखविले ॥२॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ।
ऐसा विटेवर देव कोठे ॥३॥
ऐसे वाळुवंट ऐसी हरिकथा ।
ठाई ठाई देखा दिंडीभार ॥४॥
ऐसे हरिदास ऐसे प्रेमसुख ।
ऐसा नामघोष सांगा कोठे ॥५॥
बहेणि म्हणे आम्हा अनाथाकारण ।
पंढरी निर्माण केली देवे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग