राहुनी पंढरीये जाण ज
402.
राहुनी पंढरीये जाण जो नेघे विठ्ठलदरुशन ॥१॥
महापातकी चांडाळ । त्याचा न व्हावा विटाळ ॥२॥
जिताची भोगी नर्क । जो विठ्ठला विन्मुख ॥३॥
न करी स्नान चंद्रभागे॥तो कुष्टी सर्वागें ॥४॥
नेघे पुंडलीकदरुशन । एका जनार्दनी तया बंधन ॥५॥
