वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 3. ईतर संतांच्या आरत्या

गजानन महाराजांची भूप

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073041 · अभंग क्र. ४१३

413.

गजानन महाराजांची भूपाळी

उठा उठा हो सद्गुरुराया सरली ती राती ॥ दयाळा ॥
उष:कालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती ॥धृ॥
सूर्य सारथी अरुणा पाहून प्राची निजचित्ती ॥
गेला होऊन अति आनंदित ते मी वानु किती ॥१॥
उलुक पिंगळे झाले भयभित पाहून अरुणाला ।
प्राचि प्रांत तो सद्गुरुराया लालिलाल झाला ॥२॥
चक्रवाक चंडोल पक्षि ते प्रभात कालाला ।
सूर्या बघण्या आतुर होऊनि घालिती घिरट्याला ॥३॥
तेवी बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी ।
दर्शन देउनि तयास तारा गणु म्हणे संसारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग