साईबाबांची आरती 1
410.
साईबाबांची आरती 1
आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा ।
चरणरजतळी निज दासा विसावा । भक्ता विसावा ॥धृ॥
जाळुनिया अनंग । स्वस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षुजना दावी । निजडोळा श्रीरंग ॥१॥
जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी ही तुझी माव ॥२॥
तुमचे नाम ध्याता । हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥३॥
कलियुगी अवतार । सगुणब्रम्ह साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥४॥
आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥५॥
माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणसेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ॥६॥
इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥७॥
