संत एकनाथ आरती १
410.
संत एकनाथ आरती १
भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार ।
आदिक्षेत्री स्थान वसती गोदातीर ॥१॥
ओवाळू आरती स्वामी एकनाथा ।
तुमचेनी नाम घेता हरे भवभय चिंता ॥२॥
जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद ।
भगवती टीका नारायण स्वात्मबोध (आत्मबोध) ॥३॥
ब्रम्हा विष्णू महेश ज्याशी छळावया येती ।
न ढळे ज्याची निष्ठा होय (होती) एकात्मता भक्ती ॥४॥
कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे ।
अनन्य भक्तीभावे निळा वंदी त्याचे पाय ॥५॥
