वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

शिवशक्तीचा भेद अर्धन

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075100 · अभंग क्र. ४०६

406.
शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष ।
याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥
जागृति स्थूळ तूर्या महाकारण ।
हेचि कीर खूण तुझे ठायी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे कैसे हे जाणिजे ।
देही नाद गाजे परेवरी ॥३॥

अर्थ :
ब्रह्म व माया यांचा भेद अर्धनारीनटेश्वरा प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एका शंकराच्या काही भागात पार्वतीचे रूप दिसते, वास्तविक पार्वतीला वेगळे रूप नाही. खरे रुप शंकराचेच असते. त्या प्रमाणे मायेचे वेगळे स्वरुप नाही. ती ब्रह्माच्या काही भागावर भासते. या गोष्टीचे वर्म लक्ष्यात घ्या. ज्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्था व स्थूल, सूक्ष्म, कारण वगैरे देह भासतात. त्या प्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी माया भासते. योगाभ्यासाने परावाणीमध्ये जो अनुहत ध्वनी होतो तो ऐकू येऊ लागला म्हणजे मायेचे मिथ्यात्व कळून ब्रह्मप्राप्ती होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग