वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

अमृताची क्षीर ब्रह्म

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075107 · अभंग क्र. ४०३

403.
अमृताची क्षीर ब्रह्मांडभुवनी ।
पाहाती त्रिभुवनी नवल झाले ॥१॥
नादबिंबा भेटी झाली कवण्या रीती ।
शुद्ध ब्रह्म ज्योती संचलीसे ॥२॥
प्रकृति पुरुष शिव शक्ती भेद ।
त्याचे शरीरी द्वंद्व देह जाणा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा ।
ब्रह्मांडी पाहावा ब्रह्म ठसा ॥४॥

अर्थ :
सर्व ब्रह्मांडात अमृताच्याक्षीराच्या रुपाने ब्रह्म भरलेले आहे. हे पाहून त्रिभुवनातील सर्व व्यक्तींना नवल वाटते. जीवब्रह्माचे ऐक्य कसे झाले असेल व शुद्ध ब्रह्म सर्व व्यापी आहे. असा अनुभव कसा आला असेल. ज्याच्या अंतःकरणात प्रकृति पुरुष, शिव शक्ती, वगैरे द्वैत आहे. त्याला हे कळणार नाही. म्हणून प्रथम आपण आत्मरुप आहो तसेच जगत ब्रह्मरुप आहे. हा अनुभव सहजच येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग