वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

पंढरीचे जन अवघे पावन

🙏 4. संत नामदेव · ABH-083000 · अभंग क्र. ४०३

403.
पंढरीचे जन अवघे पावन|ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥
विठ्ठलनामे घेणे विठ्ठलनामे देणें|विठ्ठलनामे करणे सकळ काम ॥२॥
विठ्ठलनामे क्रिया विठ्ठलनामे कर्म|हाचि प्रिय धर्म जया चित्ता ॥३॥
सभराभरित विठ्ठल मागे पुढे|जिकडे जाती तिकडे विठ्ठलचि ॥४॥
निरंतर गर्जती विठ्ठलपवाडे|पहाती निवाडे विठ्ठलरूप ॥५॥
विठ्ठलनामे सरते विठ्ठलनामे पुरतें|विठ्ठलनाम ज्याते भांडवल ॥६॥
विठ्ठलनामे करिती वाचे योगक्षेम|नित्य ज्याचे प्रेम विठ्ठलनामी ॥७॥
सदा ह्रदयी भरित विठ्ठलाचे प्रेम|हर्षे विठ्ठलनाम गर्जताती ॥८॥
विठ्ठलनामी गोडी धरोनी आवडी|विठ्ठलनामी बुडी दिली जेणे ॥९॥
नामा म्हणे अवघे विठ्ठलचि जाले|विठ्ठले दिधले प्रेमसुख॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग