वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

पारधी तो झड घालोनी प

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073001 · अभंग क्र. ४७

47.
पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरे ॥१॥
भयाभीत झाली पांचही ते काळी । वासना गुंतली एकमेका ॥२॥
वडील कुरंगी येऊनि त्यापाशी । लागोनी पायांसी काय बोले ॥३॥
नको मारू पति तृषेने पीडिला । मारी तू मजला तया आधी ॥४॥
आहेवपणाने धाडी स्वर्गलोका । येतुल्याने सुखा पात्र होऊ ॥५॥
इतुकीयामाजी दुसरीही आली । ती ह्मणे उगली थांब आता ॥६॥
तृषेने पीदिलो पाजी आधी पाणी । मन जैसे मनी तैसे करी ॥७॥
नामा ह्मणे भिल्ल विसरला घात । राहिला निवांत त्यांच्या बोले ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग