सकळा आगराचे जे मूळ ।
48.
सकळा आगराचे जे मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥
वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठू माझा ॥२॥
कैवल्य देखणा सिध्दांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या हृदयी बिंबला । त्रिभुवनी प्रकाशला विठू माझा ॥४॥
