वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

ऐकोनी गजबजिली दैत्यस

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089917 · अभंग क्र. ४७

47.
ऐकोनी गजबजिली दैत्यसभा ।
धाकेंचि कंसही ठाकला उभा ।
तव बीभत्सा माळभळभटाची शोभा ।
देखते झाले सकळही ॥१॥
नागवा उघडा आणि बोडका ।
जीवत्वपांगे बुडाली शंका ।
भोवते देखताही विषयलोका ।
म्हणे धावा धावा सोडवा ॥२॥
पाटेचि पुरविली माझी पाटी ।
लक्षनुलक्ष आले कोटी ।
उठा उठा पळारे शेवटी ।
मारिले जाल व्यथेंची ॥३॥
दैत्य पाहाती चहूकडे ।
शस्त्रपाणी वेधले हुडे ।
दुर्गा सांभाळिती चहूकडे ।
म्हणती न दिसे विघ्न डोळिया ॥४॥
राजा म्हणे झांका त्यासी ।
पुसा काय ते वार्तेसी ।
मग नसऊनिया वस्त्रासी ।
आणिला सभेवी पुसती ॥५॥
तो म्हणे राया बळिया बाळ ।
उपजला तो आमुचा काळ ।
विचित्र पाहता त्याचा खेळ ।
लाविली पिढींची मज पाठी ॥६॥
निळा म्हणे रुपाकृती ।
सुंदरपणाची ओतली मूर्ती ।
कोटी मदनाची अंगी दीप्ती ।
न ढळती पाती अवलोकिता ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग