मना तुझी सर्व वहने ह
48.
मना तुझी सर्व वहने हिरोनी ।
नेली ते बांधोनी विवेके हो ॥१॥
बैसोनी हृदयात होय तू ध्यानस्थ ।
संकल्पाचा हेत वंचुनिया ॥२॥
दहाही इंद्रिये होऊनी पारखी ।
विवेकाची सखी सर्व जाली ॥३॥
बहेणि म्हणे तुज रूप नाही नाव ।
मना तुझी धाव पारुषली ॥४॥
