जे का रंजले गांजले ।
47.
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ॥३॥
ज्यासी आपंगिता नाही । त्यासी धरी जो हृदयी ॥४॥
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगु किती । तोचि भगविंताची मूर्ती ॥६॥
