ऐशा दोधीजणा एकविध भा
45.
ऐशा दोधीजणा एकविध भावे । द्यायवासी जीव उभ्या ठेल्या ॥१॥
धन्य धन्य त्यांचा संसार सुफळ । सत्वाचेंचि बळ अंगामध्ये ॥२॥
पाजूनिया येई बाळक्रासी स्तन । आम्ही दोघे जण येथे असो ॥३॥
न टाका मजला सांगोनि निघाली । बिर्हाडासी आली लागवेगे ॥४॥
घेऊनिया अंकी पाडसे ती दोन्ही । लावू-निया स्तनी शोक करी ॥५॥
एकमेके सुखे राहावे अनन्य । तुटले सौजन्य तुह्मा आह्मा ॥६॥
पति पडिलासे फांसी सांडीतसे प्राण । आह्मांलागी जाणे त्याच्यासंगे ॥७॥
ह्लदयी धरोनी दिधले चुंबन । ती ह्मणती कोण पोशी आह्मा ॥८॥
येऊ तुह्मांसंगे देऊ आधी प्राण । पुढील कारण तुह्मी पाहा ॥९॥
नामा म्हणे ऐसे पांचही ते एक । देखोनि कौतुक वाटतसे ॥१०॥
