ग्रासूनी भान मान दृश
46.
ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न । आपण चिद्घन वैकुंठी रया ॥१॥
ते रुप सखोल कृष्ण रुपे खेळे । नंदयशोदेमेळे गोपीसंगे ॥२॥
नित्यता प्रकाश सर्व पूर्ण सार । आपण श्रीधर सर्व सुखे ॥३॥
तेंची हे रुपडे कृष्णनामे पिकले । यमुने स्थिरावले वेणू वार्ता ॥४॥
ज्योतीरुपे कीर्ण अनंत विस्तार । ब्रह्मांड आकार अनंतकोटी ॥५॥
निवृत्ति सोज्वळ नित्य नूतन सोय । आपणची होय गोपरुपे ॥६॥
अर्थ:
दृष्य द्रष्टा द्रष्यत्व ह्या त्रिपुटीचा आधिष्टानाने युक्त असे ते परब्रम्ह असुन ते चिद्घन अशा वैकुंठात राहते.ते परब्रह्म सगुण साकार होऊ नंद यशोदे सह गोपिकांशी खेळ खेळते.ज्याच्या अंगाच्या प्रकाशाने हे जगत प्रकाशमान होते तो सर्व सुख ज्याच्याकडे आहे आसा हा श्रीधर परमात्मा आहे.आशा ह्या परमात्माचे पुर्ण पिकलेल्या फळा सारखे कृष्णरुप जेंव्हा बासरी वाजवते तेंव्हा यमुनाही पांगुळते. त्या परमात्न्याच्या अलौकिक प्रकाशातुन निघणारा एक किरणातुन अनंत ब्रम्हांडे प्रसवत असतात.निवृत्तिनाथ म्हणतात आशी ही नित्य सोज्वळ सोय कृष्णरुपामुळे झाली असुन तो गोपरुपाने भक्ताशी एकरुप होतो.
