चंचळ चांदिणे सोमविणे
46.
चंचळ चांदिणे सोमविणे भासले ।
तेज निमाले रविबिंबेविणे ॥
जगत्रजिवनु म्हणे जगाशी कारण ।
ते अणुप्रमाण तेथे दिसे ॥
बापरखुमादेविवरू अणुप्रमाण भासला ।
सगुण निर्गुण जाला बाई ये वो ॥
अर्थ :
त्याच्या रुपाकडे पाहिले की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावते तद्वत सुर्य ही तेजासह लोप पावतो. तोच जगताचे कारण असुन तोच जगाचे जीवन आहे तरी ही त्याची व्याप्ती अणु प्रमाणे सुक्ष्म आहे. हे जीवरुपी सखी तो रखुमाईचा पती सुक्ष्म असुन सगुण व निर्गुण तोच झाला आहे. असे माऊली सांगतात.
