पोट भरुनी व्यालासी ।
48.
पोट भरुनी व्यालासी । मज सांडुनी कोठे जासी ॥1॥
धिरा धिरा पांडुरंगा । मज का टाकिले निःसंगा ॥2॥
ज्याचा जार त्यासी भार । मजला नाही आणिक थार ॥3॥
विठाबाई मायबहिणी । तुझे कृपे तरली जनी ॥4॥