उठोणि मध्यरात्रीं ते
44.
उठोणि मध्यरात्रीं तेथे आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥ पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥ धरुनी गोपी वेणी दाढी पतीची बांधिली । न सुटे ब्रह्मादिकी ऐशी गांठ दिधली ॥३॥ करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केले सुंदरा ॥४॥ जाहला प्राप्तःकाळ लगबग उठे कामिनी । वोढातसे दाढी जागा झाला तो क्षणी ॥५॥ का गे मातलीस दिली दाढी वेणी गांठी । एका जनार्दनी आण वाहे गोरटी ॥६॥
