वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

दमुनी इंद्रिये आणिला

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076340 · अभंग क्र. ४४

44.
दमुनी इंद्रिये आणिला विवेक ।
दाखविल सुख आत्मयाचे ॥१॥
मना तुझे मग काय चाले तेथे ।
राहे पै निवांत आप्णची ॥२॥
काम तो निष्काम करील विवेक ।
शांतीपासी देख क्रोध राहे ॥३॥
लोभास निर्लोभ विकुनी घालील ।
मोहोही जाळिल ज्ञानावळी ॥४॥
शुद्ध सत्त्व गुण तिन्ही अहंकार ।
घालील निर्धार धरी मना ॥५॥
आशा मनसा तृष्णा इच्छा हे वासना ।
आधीन आपणा करील तो ॥६॥
सांगितले तेची इंद्रिये वर्तती ।
विवेकसंपत्ती ब्रह्मनिष्ठ ॥७॥
बहेणि म्हणे मना नको करू बळ ।
विवेककुशळ आत्मवेत्ता ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग