तुझी नाही केली सेवा
46.
तुझी नाही केली सेवा । दुःख वाटतसे जीवा ॥1॥
नष्ट पापीण मी हीन । नाही केले तुझे ध्यान ॥2॥
जे जे दुःख झाले मला । ते तू सोशिले विठ्ठला ॥3॥
क्षमा करी देवराया । दासी जनी लागे पाया ॥4॥