निघोनिया दखो आली त्य
46.
निघोनिया दखो आली त्या तटाका । झाली एकमेका मेटी तेथे ॥१॥
परस्परे दु:ख देखता वाढले । धैर्याचेंचि बळ केले त्यांनी ॥२॥
देहभाव कांही नाठवे तयांसी । गुंतोनी मोहासी जीव देती ॥३॥
नामा ह्मणे देवे सोडवावे त्यांसी । हे तो अने-कांसी आटोपेना ॥४॥
