गगनवाड दृष्टी सर्व त
47.
गगनवाड दृष्टी सर्व तत्व शेखी । जीव शिव शेखी कारण सिध्द ॥१॥
तेची हे सांवळे स्वरुप गोजिरे । कृष्णनाम खरे नंदाघरी ॥२॥
पृथ्वीचे तळवट अनंत विराट । आपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥
निवृत्ति तत्पर लक्षते स्वानंद । नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥
अर्थ:
गगनाहुन जास्त लांब जाणारी दृष्टी असलेले परब्रह्मा मुळे जीव व शिवाची वाढ होते. ते सिध्द तत्व आकाशाहुन मोठे व सर्वांच्या परे आहे. तेच तत्व सगुण सावळे कृष्णरुप घेऊन नंदाच्या घरी अवतरले आहे. मोठेपणाचे माप असलेली पृथ्वी हि त्याच्या पायाशी असुन ते पृथ्वीपेक्षा विराट आहे. ते तत्व श्रीकृष्ण बनुन गोपीसवे क्रीडा करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वानंदासाठी तत्पर असुन त्यावर लक्ष ठेऊन हा आनंद नित्य उपभोगत असतो.
