बाळलेणे संस्कार.
45.
बाळलेणे संस्कार.
ब्राह्मण आशिर्वाद देती । नंदा पुसोनि निघती ॥१॥
चलाचला म्हणती लोक । पाहू नंदाचे बालक ॥२॥
नरनारी हो अलं-कार । शृंगारिले सर्वपूर ॥३॥
दैन्य दारिद्र अपेश । पळती मानू-निया त्रास ॥४॥
आणिताती बाळलेण । स्त्रिया पाहताती कृष्ण ॥५॥
नामा ह्मणे पाहता मुख । देहभाव जाय सकळीक ॥६॥
