वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

वर्ण व्यक्ती सरवे वर

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090175 · अभंग क्र. ४३

43.
वर्ण व्यक्ती सरवे वर्णाश्रम मुखे । ब्रह्मनाम सौख्य योगीजन ॥१॥
ते हे कृष्ण नाम देवकीसबळ । वसुदेवकुळ गोपवेषे ॥२॥
धर्म धरि धार धारण धीरट । निरालंब पीठ सौख्य शोभा ॥३॥
निवृत्ति सौभाग्य ब्रह्म सर्व सांग । गुरुनामे पांग हरे एक ॥४॥

अर्थ:
योगीजन सुध्दा जीवन पोषणासाठी आपल्या वाटेला आलेला व्यवसाय करुन तसेच आपल्या वर्णातील लोकांच्या साहाय्याने विवाह करुन जीवन व्यतीत करत असतात. अशा योगीजनांचे परब्रह्म देवकीच्या पोटी जन्माला येऊन वसुदेवाच्या घरी गोपवेशात वावरत असुन त्यामुळे त्यांचे भाग्य उजळले आहे. ते परब्रम्ह निरलंब स्थानात सौख्याने राहात असताना धर्माला धारण करुन धर्मरक्षण करते. निवृत्तिनाथ म्हणतात मला त्याचे ब्रह्मस्वरुप. मी माझ्या गुरुंच्या केलेल्या नाम चिंतनामुळे कळले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग