वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

वडील कुरंगी काय बोले

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073000 · अभंग क्र. ४८

48.
वडील कुरंगी काय बोले त्यासी । सांगते धर्मासी पूर्वीलीया ॥१॥
बांधोनी मारिता घडे महादोष । पाजी उदकास सोडोनिया ॥२॥
पुऊनिया जळ येऊ तुजपाशी । मग सावकासी करी काज ॥३॥
आमुचा विश्वस नाही तुज जरी । मागशी त्यापरी भाक देऊ ॥४॥
पर उपकारी पडतसे देह । लोभ आता काय वांचूनिया ॥५॥
भुकेलिया अन्न तान्हेल्या जीवन । पुण्यासी कारण इतुकेंची ॥६॥
पांचजणी तुज बोपीयेले देह । यालागी संदेह न धरावा ॥७॥
नामा ह्मणे ऐसा प्रार्थिता किरात । द्रवला मनांत काय बोले ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग