कामे नेले चित्त नेदी
47.
कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख । बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय ॥१॥
का जी सासुरवासी मज केले भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही ॥धृ॥
प्रभातेसि वाटे तुमच्या यावे दर्शना । येथे न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥
येथे अवघे वांया गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥३॥
