काय सांगो आता संतांच
45.
काय सांगो आता संतांचे उपकार कार । मज निरंतर जागविती ॥१॥
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई । ठेविता हा पायी जीवा थोडा ॥२॥
सहज बोलणे हीत उपदेश । करुनि सायास शिकविती ॥३॥
तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती । तैसे मज येती साभाळीत ॥४॥
