बहुतांपरी वानितसे दे
44.
बहुतांपरी वानितसे देवा । न कळे केशवा कांही मज ॥१॥
सेवा कैसी करू काय ध्यान करू । न कळे साचार कांही मज ॥२॥
कैसी ती भक्ति करावी देवा । न कळे कांही हेवा दुजा मज ॥३॥
तुमच्या उकच्छष्टाची आस निधार्री । म्हणतसे म्हारी चोखियाची ॥४॥
