वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

मूळ ना डाळ शाखा ना प

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074990 · अभंग क्र. ४८

48.
मूळ ना डाळ शाखा ना पल्लव ।
तो हा कैसा देव आम्हा घरी ॥
निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा ।
जिवी शिवी प्रभा दाविता हे ॥
नकळे याची गति न कळे याची लीळा ।
आपि आप सोहळा भोगीतसे ॥
ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी ।
आपण चराचरी नांदतसे ॥

अर्थ :
ज्याला मूळ नाही फांद्या व पान नाहीत असा वृक्षस्वरुप देव आमच्या घरी आहे. तो निर्गुणपणात उभा राहुन सगुणपणे शोभा दाखवतो व त्याची प्रभा जीव शिवावर पसरली आहे. त्याची गती कळत नाही त्याच्या लीला समजत नाहीत तरी तो सगळे सोहंळे भोगतो आहे. माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याची थोरवी कळत नाही तरी तो आपण होऊन सर्व चराचरात नांदत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग