वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 10. वेणी - अभंग ४३ ते ४७

वेणी - अभंग ४३ ते ४७

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085183 · अभंग क्र. ४३

43.
वेणी - अभंग ४३ ते ४७
गोकुळामाजी कृष्णें नवल केले । स्त्री आनि भ्रतारा विंदान दाविले ॥१॥ खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिका अगम्य त्याची लीळां वो ॥२॥ एके दिनीं गृहा गेले चक्रपाणी । बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोनी ॥३॥ गौळणी आली घरा म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनी ॥४॥ चोरी करावया जरी येसी सदनी । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ॥५॥ एका जनार्दनी ऐसे बोले व्रजबाळी । दाविलेंअ लाघव ब्रह्मादिका न कळे ते काळी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग