काय वाणू आता न पुरे
44.
काय वाणू आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
थोरीव सांडिली आपुली परिसे । नेणे शिवो कैसे लोखंडासी ॥२॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती परउपकारे ॥३॥
भूतांची दया हे भांडवल संता । आपुली ममता नाही देही ॥४॥
तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्त्रवतसे ॥५॥
