वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

परी ते कर्म बळोत्तर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089846 · अभंग क्र. ४५

45.
परी ते कर्म बळोत्तर ।
नेदी राहो वृत्ति स्थिर ।
झोंबोनिया विखार ।
आणिला ओढोनि लोभावरी ॥१॥
मग म्हणे वो सुंदर बाळ ।
यशोदे नागर हे वेल्हाळ ।
परि याचा जन्मकाळ ।
कैसा असेल पाहो तो ॥२॥
कृष्णपक्ष श्रावण मास ।
रोहिणी नक्षत्र अष्टमी दिवस ।
मध्यरात्रीचा जन्म यास ।
दशा तो क्रूर दिसताहे ॥३॥
जन्मकाळी सर बारावा गुरु ।
शनी भोग हानिस्थानी स्थिरु ।
राहो केतु आणि दिनकरु ।
देशत्यागाते सुचिती ॥४॥
याचेन सकल वंश हानि ।
करील कुळाची बुडवणी ।
नये अवलोकु याते नयनी ।
टाकावा नेऊनि अरण्यात ॥५॥
यशोदे न लावी यासी उशीर ।
बाळ नव्हे हा मायावी खेचर ।
कालचि पाहेपां केला संहार ।
पेतनेचा क्षणही न लागता ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि ऐसे ।
मोडले विंदान परमपुरुषे ।
जयाचे कर्म देखिले जैसे ।
दिल्हे तया तैसे दानफळ ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग