माझे माझे म्हणुनी गु
47.
माझे माझे म्हणुनी गुंतले हावभरी । वाया या संसारी मृगजळा ॥१॥
आपली आपण करा आठवण । संसार बंधन तोडा वेगी ॥२॥
नाम निज नौका विठ्ठल हे तारू । भवाचा सागरू उतरील ॥३॥
हाचि पे विश्वास धरावा अंतरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥