झाली आत्मपूजा देव शे
44.
झाली आत्मपूजा देव शेजे पहुडला । म्हणोनिया थोर थोर आनंद झाला ॥
वैकुंठीचा देव कैसा पंढरिसा आला । पुंडलिकाचा भाव देखोनि तन्मय झाला ॥
धामणगावी भक्त एक थोर ऐकीला । गरुडावर बैसोनी कैसा धावत आला ॥
बोधला म्हणे थोर आनंदु झाला । हृदयी प्रगटे बोधला निज निजेला ॥
