वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

ज्ञानेसी विज्ञान उन्

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090010 · अभंग क्र. ४५

45.
ज्ञानेसी विज्ञान उन्मनी निमग्न । द्वैत रुपे भग्न उरो नेदी ॥१॥
तोचि हा गोपाळ गोपीसंगे खेळे । गो गोपाळ मेऴे नंदाघरी ॥२॥
दष्य द्रष्टा सर्व तितिक्षा उपरती । श्रुतीसी संपत्ति तेथे जाण ॥३॥
निवृत्ति सधर गोरक्ष गयनी । ब्रह्मरुपी पूर्णी समरसे ॥४॥

अर्थ:
ज्ञान म्हणजे स्वरुपाची ओळख व विज्ञान म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जाणारी निश्चयात्मक बुध्दी आणी उन्मनी म्हणजे अवस्था, ते ब्रह्म ह्या तिन्ही मध्ये मग्न असते ते द्वैताला जवळ ही येऊ देत नाही. तोच हा गोपाळ सगुण रुप धारण करुन गोपाळांच्या मेळ्यात गोपिकांबरोबर खेळत आहे व नंदा घरी वास करते. तो ब्रह्म द्रष्टा दृष्य द्रष्टत्व ह्या त्रिपुटीचा आधिष्टाता असुन तो तितिक्षा म्हणजे शम दम विकारांना सहनकरणारा व उपरती म्हणजे वैराग्य ह्या श्रृतीनी सांगितलेल्या संपत्तीने युक्त आहे.
निवृत्तिनाथ म्हणतात गोरत्ष व गयनी ह्या नाथांच्या वैचारिक आधाराने मी ह्या ब्रह्मस्वरुपाशी समरस झालो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग