तुतारे भोंवारे वाजंत
44.
तुतारे भोंवारे वाजंत्रे वाजती । अप्सरा नाचती थैयथैय ॥१॥
झणण झणण झांजा गर्जताती । नौबदा वाजती धोधोधोधो ॥२॥
सुरवर येत विमानाची दाटी । करिती पुष्पवृष्टि देवावरी ॥३॥
नारद तुंबर किन्नर गंधर्व । व्योमी गाती सर्व सप्त-स्वरी ॥४॥
कीर्तनाचा घोष नामाचा गजर । मृदंग सुस्वर वाजताती ॥५॥
केशरी गंधाचे टिळक लावी भाळा । घाली पुष्पमाळा द्विजांकंठी ॥६॥
घरोघरी नंद धादी शर्करेशी । वस्त्रे सुह्लदांसी नांआ ह्मणे ॥७॥
