न कळे जयाचे विंदान ।
3277.
न कळे जयाचे विंदान । हरिहर नेणती महिमान । शिणलें शेषाचें वदन । तो तटस्थ राहिला ॥१॥
ऐसा आकळ त्रिभुवनी । न कळे वेद शास्त्रा मनी । पुराणांची आयणी । कुंठीत जाहली ॥२॥
तो सोपा नाममंत्रें । वाचे वर्णिता पवित्रें । एका जनार्दनी वक्त्रें । म्हणा रामकृष्ण हरी ॥३॥
