वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

बाळ काय जाणे जीवनउपा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080697 · अभंग क्र. ३३०४

3304.
बाळ काय जाणे जीवनउपाय । वाहे मायबाप सर्व चिंता ॥१॥
आइते भोजन खेळणे अंतरी । अंकिताच्या शिरी भार नाही ॥धृ॥
आपुले शरीर रक्षिता न कळे । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥
तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । आमुची ते सत्ता तयावरी ॥३॥

अर्थ :
लहान मुलाला जीवन जगण्यासाठी कोणते उपाय करावे लागतात हे माहित असते काय परंतू त्याचे आईवडिलच त्याची सर्व चिंता वाहत असतात. त्यासाठी आयते भोजन येते त्याला जेवण देखील आयते मिळते फक्त खेळणे एवढेच त्याचे लक्ष्य असते आणि तो दुसऱ्याचा अंकीत असतो त्यामुळे त्याच्या माथ्यावर कोणत्याही प्रकारचा भार नसतो. आपल्या शरीराचे रक्षण कसे करावे हे देखील त्याला कळत नाही त्याचे सर्व पालनपोषण त्याची आई बाप करुन त्याचे सर्व लाड देखील तेच पूर्ण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जनिता माझा जन्मदाता हा विठ्ठलच आहे आणि आमची सत्ता त्याच्यावर आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग