वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

रुसलो आह्मी आपुलिया

🙏 3. संत तुकाराम · ABH-080608 · अभंग क्र. ३२९८

3298.
रुसलो आह्मी आपुलिया संवसारा । तेथे जनाचारा काय पाड ॥१॥
आम्हा इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाही या दुसरे देवाविण ॥धृपद॥
दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथे ॥२॥
उपाधिवचन नाइकती कान । त्रासले हे मन बहु माझे ॥३॥
तुका म्हणे करा ठाकेल ते दया । सुख दुःख वाया न धरावे ॥४॥

अर्थ :
अहो येथे आम्ही आमच्या संसारावरच रुसलो आहोत तर मग लोकाचाराची येथे काय भीड आहे ? देवावाचून आता आम्हाला इष्ट, मित्र, सज्जन, सोयरे दुसरे कोणीही नाही. जेथे आम्ही सहोदर सखे बंधू यांनाच दूर केले आहे तेथे इतरांचा काय विचार करायचा आहे ? कोणत्याही प्रकारचे उपाधीचे वचन आता माझ्या कानाला ऐकावेसे वाटत नाही कारण संसाराला माझे मन खूप त्रासले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जनहो त्यामुळे तुम्ही आता माझ्यावर दया धरायची असेल तर धरा नाहीतर धरुही नका आणि माझ्या सुख दु:खाची काळजी तर अजिबात करुच नका.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग