वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पिकलिया सेंद कडुपण ग

🙏 3. संत तुकाराम · ABH-080510 · अभंग क्र. ३२९०

3290.
पिकलिया सेंद कडुपण गेले । तैसे आम्हा केले पांडुरंगे ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥धृपद॥
आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे । संसारी जन्मीजे याचि लागी ॥३॥

अर्थ :
सेंद नावाचे फळ पिकले की त्याच्या आतील कडूपणा जातो अगदी त्याप्रमाणेच पाडूरंगाने आमच्याविषयी केले आहे. काम, क्रोध, लोभ हे आमच्या अंत:करणातून जागच्या जागीच नाहीसी झाली आहे त्यामुळे सर्व सृष्टी आम्हाला आनंदाची झाली आहे. मी ब्रम्ह आहे किंवा नाही याविषयी आठवले किंवा नाही आठवले तसेच प्रपंचाविषयी भाव, अभाव हे सर्व नाहीसे झाले असून स्वत: पाडूरंगच सर्व काही झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपली जीवदशा नाहीसे होऊन आपल्याला ब्रम्ह अवस्था प्राप्त होणे याचेच नांव भाग्य असे आहे आणि संसारात जन्माला यायची इच्छा धरणे किंवा संसारामध्ये जन्माला यावे ते केवळ एवढेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग