वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

लावूनि कोलित । माझा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080676 · अभंग क्र. ३३१०

3310.
लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥
ऐसे बहुतांचे संधी । सापडला खोळेमधी ॥धृपद॥
पाहातील उणे । तेथे देती अनुमोदने ॥२॥
तुका म्हणे रिघ । पुढे नाही झाले धींद ॥३॥

अर्थ :
अहो हे दुष्ट लोक माझ्या अंगाला कोलीत लावून माझा घात करतील. अशा खूप दुष्ट प्रकारच्या लोकांच्या मध्ये मी सापडलो आहे. माझ्यामध्ये काही कमीपणा आहे काय तो शोधतील आणि माझा घात करण्यासाठी हे अनुमोदन देतील. तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे माझे आयुष्य सुखाने जाईल की नाही काय माहित नाही कारण या दुष्ट लोकांनी माझी खूप फजिती केली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग