वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

सातादिवसांचा जरी झाल

🙏 3. संत तुकाराम · ABH-080915 · अभंग क्र. ३२७९

3279.
सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरी कीर्तनासी टाकु नये ॥१॥
फुटो हा मस्तक तुटो हे शरीर । परी नामाचा गजर सोडू नये ॥धृपद॥
शरीराचे होत दोनी तेही भाग । परि कीर्तनाचा रंग सांडो नये ॥२॥
तुका म्हणे ऐसा नामी झाला निर्धार । तेथे निरंतर देव वसे ॥३॥

अर्थ :
जरी एखादया मनुष्याला सात दिवस अन्न खाण्यास मिळाले नाही तो उपाशी राहिला तरी त्याने किर्तनाला जाण्याचे सोडू नये. हे मस्तक फुटून जावो किंवा हे शरीर तुटून जावो तरी देखील नामाचा गजर करणे सोडू नये. अहो शरीराचे दोन तुकडे जरी झाले तरी देखील किर्तनाचा रंग सोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, नामाविषयी व किर्तनाविषयी असा ज्याचा दृढविश्वास झालेला असतो त्याच्या ठिकाणी देव निरंतर वस्ती करत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग