आपुला न टाकीं पा आचा
3275.
आपुला न टाकीं पा आचार । उपजले कुळींचा वेव्हार । स्वधर्म तो सार । पाळीं पाळीं बापा ॥१॥
त्याते म्हणणे संसार । येर बोलणें असार । निष्ठावंत जे नर । देवाचि समान ॥२॥
अथीतासी द्यावे अन्न । गोब्राह्मणांचें पूजन । मुखी नामस्मरण । तोचि एक संसारी ॥३॥
सांडोनिया गृह दारा । धांव घेतली डोंगरा । अंतरी भरला सारा । विषयीक भाव ॥४॥
बकाचे परि ध्यान । नको नको अनुष्ठान । एका जनार्दनी मन । स्थिर करी सर्वदा ॥५॥
